पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड(पीरामल फायनान्स), च्या मालकीची (पीरामल ग्रुपच्या मालकीची कंपनी) पीरामल फायनान्स या नावाने ओळखले जाते. ती नॅशनल हाऊसिंग बँकेकडे गृहवित्त कंपनी म्हणून नोंदणीकृत आहे आणि ती विविध आर्थिक सेवा व्यवसायांमध्ये कार्यरत आहे. ती विविध क्षेत्रांमध्ये होलसेल आणि रिटेल वित्तपुरवठ्याच्या संधी देते. रिअल इस्टेटच्या क्षेत्रात हा प्लॅटफॉम गृहनिर्माण वित्तपुरवठा करतो आणि संपूर्ण भांडवली क्षेत्रात इतर आर्थिक उपाययोजनाही देतो. त्यात सुरूवातीच्या टप्प्यातील खासगी समभाग, रचनात्मक कर्ज, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित कर्ज, बांधकाम वित्तपुरवठा आणि लवचिक कालावधीतील भाडे सवलत अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. पीरामल फायनान्सने अलीकडेच हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. आम्ही सध्या प्रस्थापित आणि उगवत्या बाजारपेठांमध्ये ब्रँडेड कंपन्यांकडून चालवल्या जाणाऱ्या हॉटेल्सना वित्तपुरवठा करत आहोत. बिगर रिअल इस्टेट क्षेत्रातील होलसेल उद्योगात विविध भाग आहेत- हॉर्पोरेट फायनान्स ग्रुप (सीएफजी) आणि उगवते कॉर्पोरेट कर्जपुरवठा (ईसीएल). सीएफजी पायाभूत सुविधा, नूतनक्षम ऊर्जा, रस्ते, औद्योगिक, ऑटो घटक अशा विविध क्षेत्रांना कस्टमाइज्ड वित्तपुरवठा उपाययोजना देते तर ईसीएल लघु आणि मध्यम उद्योगांना (एसएमई) वित्तपुरवठा करण्यावर भर देते. रिटेल कर्जपुरवठ्याची सुरूवात ही कंपनीच्या आर्थिक सेवा व्यवसायाचे आकारमान, व्याप्ती आणि वाढ यांच्यामुळे झालेली नैसर्गिक प्रगती होती. गृहनिर्माण वित्तपुरवठ्याची शक्ती कंपनीचा अनुभव आणि तिचे होलसेल कर्जपुरवठा आणि बांधकामाच्या क्षेत्रातील नेटवर्क यांच्यावर अवलंबून आहे. पीरामल फायनान्स आपल्या समूह कंपन्यांच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्विकासावर लक्ष केंद्रित करणाऱ्या मुंबई पुनर्विकास निधीसारख्या संस्थात्मक आणि रिटेल गुंतवणूकदारांवर आणि मोठ्या प्रमाणावर खरेदी करणाऱ्या वैयक्तिक घरांसाठीच्या (पीरामल फंड मॅनेजमेंटद्वारे) अपार्टमेंट फंड आणि सीपीपीआयबी, एपीजी आणि इव्हानहो केंब्रिज यांच्यासारख्या आघाडीच्या जागतिक निवृत्तीवेतन फंड्ससोबत धोरणात्मक भागीदारीद्वारे वित्तपुरवठा करते.