₹ 18 लाख
20 वर्षे
9.50%* वार्षिक
पात्रता निकष प्रामुख्याने तुमच्या रोजगारावर आधारित आहे. तुमच्या रोजगाराचा प्रकार निवडा आणि तुमची पात्रता तपासा.
मला या कागदपत्रांची यादी व्हॉट्सएपवर पाठवा
मला या कागदपत्रांची यादी व्हॉट्सएपवर पाठवा
पीएमएवाय म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना. ती भारतीय केंद्र सरकारने समाजाच्या विविध वर्गांना परवडणाऱ्या दरातील गृहनिर्माण उपलब्ध करून देण्याच्या हेतूने सुरू केलेली क्रेडिट लिंक्ड सवलत योजना (सीएलएसएस) आहे.
हो, पीरामल फायनान्स पीएमएवाय योजनेअंतर्गत गृहकर्जे देते. भारताच्या कोणत्याही भागात पक्के घर नसलेले लाभार्थी कुटुंब (सर्व हवामानात टिकणारे घर) ईडब्ल्यूएस/ एलआयजी/ एमआयजी-१ आणि एमआयजी-२ च्या विविध योजनांतर्गत कुटुंबासाठी विनिर्दिष्ट केलेल्या विविध निकषांच्या सापेक्ष प्रस्तुत सवलतीसाठी पात्र आहे. या योजनेद्वारे लाभार्थी घरखरेदी/ बांधकामावर व्याजाची सवलत प्राप्त करण्यासाठी पात्र आहे.
प्रधान मंत्री आवास योजना सवलत योजना कमाल २० वर्षांच्या कालावधीसाठी लागू आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी असलेल्या अनेक अर्जदारांचा विचार करता सवलत ३-४ महिन्यांत मिळवता येईल. सरकार सवलती स्वीकृत करण्यापूर्वी सखोल पडताळणी प्रक्रिया पूर्ण करते.
पीएमएवाय योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात घरे देण्यासाठी सरकार २० वर्षांच्या कालावधीसाठी गृहकर्जांवर ६.५ टक्क्यांची व्याज सवलत देईल.
कर्जदार पहिल्यांदा घर घेतात किंवा बांधतात तेव्हा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) सवलत प्राप्त करू शकतात. कर्जदार गृहकर्जाची शिल्लक रक्कम हस्तांतरित करू शकतात. परंतु शिल्लक रकमेच्या हस्तांतरणावर त्यांना सवलत मिळवता येणार नाही.
तुम्ही पीरामल फायनान्सने दिलेल्या अर्ज ओळखपत्राचा वापर करून एनएचबी वेबसाइटवर www.pmayuclap.gov.in तुमच्या पीएमएवाय अर्जाची स्थिती तपासू शकता.
प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय)मुळे प्रथमच घर घेणाऱ्या पात्र खरेदीदारांना त्यांच्या पहिल्या मालमत्तेच्या खरेदीसाठी त्याच्या निकषांवर आधारित राहून सवलती मिळवणे शक्य होते.पीएमएवाय योजना वार्षिक उत्पन्न १८ लाख रूपयांपेक्षा जास्त नसलेल्या कोणत्याही कुटुंबाला खुली आहे. तुम्हाला पीएमएवाय सवलतीच्या आर्थिक लाभासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही आमच्या कोणत्याही विभागात करू शकता. तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय) मार्फत तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करायचा विचार करत आहात का? आमची तज्ञांची टीम तुम्हाला अर्जाच्या प्रक्रियेत प्रत्येक टप्प्यावर मदत करेल. आमचे सर्वांत जवळच्या शाखांमधील व्यावसायिक तुमच्या अर्जाचे मूल्यमापन करतील आणि तो शक्य तितक्या लवकर प्रक्रिया करतील. आमचा हेतू प्रक्रिया सुलभ करून तुमच्यासाठी शक्य तितकी वेगवान आणि सोपी करण्याचा आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र ठरण्यासाठी खालील गोष्टींचे पालन करून आमच्या गृहकर्जासाठी अर्ज करा.
तुमच्या सवलतीला मंजूरी मिळाल्यानंतर ती तुमच्या गृहकर्जाबाबत आपोआप समायोजित केली जाईल. त्याचा परिणाम म्हणून तुमच्या स्वप्नातील घर खरेदी आणखी सोपी होईल. आमचे समर्पित रिलेशनशिप मॅनेजर तुमच्या गृहकर्ज अर्ज प्रक्रिया किंवा पीएमएवाय किंवा त्याच्या स्थितीबाबत काहीही प्रश्न असल्यास त्याची उत्तरे देण्यासाठी उपलब्ध असतील. पीरामल फायनान्समध्ये तुम्ही गृहकर्ज घेता तेव्हा घर खरेदी करणे अडथळामुक्त होण्यासाठी लवचिक कालावधी आणि हप्त्यांसह विविध लाभ मिळवू शकता.
आम्ही गृह सेतू गृह कर्ज योजनेसाठी अर्ज दाखल केला. त्याला २९ वर्षांच्या कालावधीसाठी मान्यता मिळाली आणि त्याची मला गरज आहे. माझे कुटुंब आणि मी खूप खूश आहोत आणि आमच्या नवीन घरात जाण्याची आम्हाला उत्सुकता लागली आहे.
राजेंद्र रूपचंद राजपूत