प्राप्तीकर खात्याकडील अधिसूचनेनुसार प्राप्तीकर परतावा भरण्यासाठी पॅन कार्ड आधार कार्डशी जोडणे सक्तीचे आहे. तथापि, प्राप्तीकर परतावे आधार न जोडता दाखल केले जाऊ शकत असले तरी पॅन आणि आधार जोडलेले असल्याशिवाय प्राप्तीकर परताव्यांवर प्रक्रिया करणार नाही.
तुम्ही 50,000 रूपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे बँकिंग व्यवहार करत असल्यास तुमच्या पॅनशी आधारला जोडणे हेदेखील आवश्यक आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून प्राप्तीकर परतावे दाखल करून इतर लाभ मिळवण्यासाठी पॅनकार्ड आणि आधार कार्ड यांना जोडणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
पॅन आणि आधार जोडण्याची अंतिम तारीख
सरकारने आधार आणि परमनंट अकाऊंट नंबर (पॅन) यांना जोडण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 पर्यंत वाढवली आहे. आधीची अंतिम तारीख 31 मार्च 2022 पर्यंत होती. तथापि, 31 मार्च 2022 पर्यंत आपले पॅन आणि आधार कार्ड जोडण्यात अपयश आल्यास दंड आकारला जाईल.
1 एप्रिल 2022 ते 30 जून 2022 दरम्यान पॅन आणि आधार लिंक केल्यास 500 रुपये दंड आकारला जाईल. 1 जुलै 2022 पर्यंत आधार आणि पॅन लिंक केल्यास, दंड ₹1,000 असेल. प्राप्तीकर खात्याने करदात्यांना त्यांचे पॅनकार्ड आणि आधार कार्ड जोडण्यासाठी खालीलप्रमाणे दोन पर्याय उपलब्ध करून दिले आहेतः
- प्राप्तीकर खात्याच्या ई- फायलिंग वेबसाइटद्वारे
- 56161 किंवा 567678 ला एसएमएस पाठवून
प्राप्तीकर खात्याच्या ई- फायलिंग वेबसाइटच्या माध्यमातून पॅन कार्ड आधारशी कसे जोडावे?
तुम्हाला आयटी वेबसाइटद्वारे पॅन कार्ड तुमच्या आधारशी ऑनलाइन लिंक करायचे असल्यास तुम्हाला काही सोप्पे टप्पे पूर्ण करावे लागतील. ऑनलाइन प्रक्रिया अडथळामुक्त असून त्यातून खूप वेळ वाचतो. त्यामुळे तुम्ही खाली नमूद केलेली जोडणी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहेः
टप्पा 1: पॅन कार्डला आधार कार्डशी जोडण्यासाठी अधिकृत प्राप्तीकर खात्याच्या वेबसाइटला भेट द्या.
टप्पा 2: "क्विक लिंक्स" मध्ये जा आणि "लिंक आधार"चा पर्याय निवडा.
टप्पा 3: तुमचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक, आधारवर दिसणारे नाव आणि मोबाइल नंबर अशी माहिती नमूद करा. आधार कार्डमध्ये फक्त जन्मतारीख असल्यास बॉक्सवर तशी खूण करा आणि तुम्ही तुमची आधार माहिती सत्यापित करण्यास संमती देत असल्यास चौकोन चिन्हांकित करा. त्यानंतर "लिंक आधार"चा पर्याय निवडा.
टप्पा 4: अर्ज पूर्ण करण्यासाठी कॅपचा कोड टाइप करा. (अंधत्व असलेल्या व्यक्ती कॅप्चा कोडऐवजी ओटीपी मागू शकतात.)
एसएमएसचा वापर करून पॅन कार्ड आधारशी कसे जोडावे
तुम्ही पॅनला आधारशी जोडण्यासारखी एसएमएस वैशिष्टे वापरू शकता. खाली नमूद केलेल्या टप्प्यांचे पालन करण्यात यावेः
टप्पा 1: तुमच्या मोबाइलवर तुमचा यूआयडीपॅन नमूद करा (12 अंकी आधार, 10 अंकी पॅन).
टप्पा 2: पॅनकार्डला आधार कार्डशी यशस्वीरित्या जोडण्यासाठी 567678 किंवा 56161 ला पाठवा.
पॅन आणि आधार कार्ड या दोन्ही दस्तऐवजांना यशस्वीरित्या जोडण्यासाठी त्यात दुरूस्तीची प्रक्रिया
आपले पॅन आणि आधार लिंक करण्याचा प्रयत्न करताना, बहुतेक लोकांना या दोन्ही दस्तऐवजांमधील माहितीच्या विसंगतीचा सामना करावा लागतो. नाव, जन्मतारीख आणि जन्मवर्ष यांच्यासारखी महत्त्वाची माहिती या दोन्ही दस्तऐवजांमध्ये एकसारखी नसल्यास दस्तऐवज जोडणे अडचणीचे ठरू शकते.
आधारमध्ये सुधारणा करणे हा या संदर्भातील माहिती अपडेट करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे जेणेकरून ती जुळेल. तुमच्या आधार कार्डवर नाव, जन्मतारीख, पत्ता, लिंग, मोबाईल फोन नंबर आणि भाषा बदलता येऊ शकते. इतर कोणत्याही दुरुस्त्या करण्यासाठी तुम्ही सर्वात जवळच्या आधार नोंदणी किंवा अपडेशन केंद्रावर जाणे आवश्यक आहे.
वेबसाइटचा वापर करून आधार कार्डमध्ये बदल करण्यासाठी खालील टप्पे वापरता येतील.
- UIDAI वेबसाइटला भेट द्या.
- तुमचे खाते पाहण्यासाठी 12 अंकी आधार क्रमांक आणि कॅपचा कोड टाका.
- "ओटीपी" पर्याय निवडण्यात यावा. त्यानंतर नोंदणीकृत क्रमांक ओटीपीसोबत देण्यात येईल.
- ओटीपी टाकल्यानंतर सबमिट बटण दाबा.
- अपडेट करणे आवश्यक असलेल्या आधार कार्डवरील विभागांचा पर्याय निवडा.
- आधारभूत कागदपत्रांचा एक स्कॅन जवळ ठेवा कारण ते अपलोड करणे आवश्यक आहे.
- आधीचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर यूआरएन (अपडेट रिक्वेस्ट नंबर) दिला जातो. त्यानंतरच्या प्रक्रियेसाठी हे आवश्यक आहे.
- आधारमध्ये नवीन माहिती अद्ययावत झाल्यानंतर त्याची हार्ड प्रत मिळवता येईल.
ऑफलाइन पद्धतींचा वापर करून सुधारणा करण्यासाठी खाली टप्प्यांचे पालन करण्यात यावे:
- यूआयडीएआय वेबसाइटला भेट द्या, स्त्रोतांचा पर्याय निवडा, नोंदणी दस्तऐवज निवडा आणि त्यानंतर आधार दुरूस्ती अर्ज डाऊनलोड करा.
- बदलणे आवश्यक असलेली सर्व माहिती पूर्ण भरा.
- कोणतेही बदल करणे आवश्यक असल्यास कोणतेही आवश्यक ते सहाय्यभूत दस्तऐवज समाविष्ट करणे आवश्यक आहे.
- सुधारित अर्ज खालील पत्त्यावर पाठवण्यात यावाः यूआयडीएआय, पोस्ट बॉक्स क्र. 99, बंजारा हिल्स, हैदराबाद, भारत- 500034.
पॅन कार्डमध्ये दुरूस्ती आवश्यक असल्यास खालील टप्प्यांचे पालन करावेः
- पॅन कार्डमध्ये दुरूस्तीसाठी Protean eGov Technologies Limited वेबसाइटला भेट द्या.
- ड्रॉप डाऊन मेनूमधून "चेंज ऑर करेक्शन इन पॅन कार्ड" निवडा.
- येणाऱ्या नवीन पृष्ठावर "पॅन कार्ड तपशिलांमध्ये बदल किंवा सुधारणेसाठी अर्ज करा" निवडा. आवश्यक ती माहिती पूर्ण करा.
- कोणत्याही नमूद केलेल्या ऑनलाइन पद्धतींचा वापर करून अर्जासाठीचे प्रदान करा.
- त्यानंतर तुम्ही प्रोटीयन इगव्ह टेक्नॉलॉजीज लिमिटेड कार्यालयात इमेल पाठवण्यापूर्वी पावतीची प्रिंट घ्यावी. तुमचा अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह म्हणजे ओळखीचा पुरावा, पत्ता आणि जन्मतारखेच्या पुराव्यांसह पाठवा. तुम्ही पावतीची प्रत खालील पत्त्यावर पाठवावी:
- प्राप्तीकर खाते पॅन सेवा विभाग (प्रोटीयन इगव्ह टेक्नॉलॉजीज लिमिटेडकडून व्यवस्थापित), 5 वा मजला, मंत्री स्टर्लिंग, प्लॉट क्र. 341, सर्व्हे क्र. 997/8, मॉडेल कॉलनी, दीप बंगला चौकाजवळ, पुणे- 411 016.
- प्राप्तीकर खाते पॅन सेवा विभाग (प्रोटीयन इगव्ह टेक्नॉलॉजीज लिमिटेडकडून व्यवस्थापित), 5 वा मजला, मंत्री स्टर्लिंग, प्लॉट क्र. 341, सर्व्हे क्र. 997/8, मॉडेल कॉलनी, दीप बंगला चौकाजवळ, पुणे- 411 016.
निष्कर्ष
कोणत्याही दंडाशिवाय भविष्यातील प्राप्तीकर परतावा भरण्यासाठी पॅन कार्डला आधारशी लिंक करणे ही एक महत्त्वाची पायरी आहे. पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीचा अवलंब करावा. त्यामुळे तुम्हाला टॅक्स फाइलिंगचे थोडक्यात तपशील आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती मिळण्यास मदत होईल. तुमचा आयकर भरणे देखील तुलनेने सोपे होईल, कारण वेबसाइट आपोआप आधार कार्डमधून आवश्यक ते सर्व तपशील घेते. पिरामल तुम्हाला इतर कोणत्याही आर्थिक समस्यांबद्दल मार्गदर्शन करू शकतात. त्यांच्या वेबसाइटवर संबंधित ब्लॉग वाचा किंवा त्यांची वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड आणि आर्थिक कॅल्क्युलेटर अशी आर्थिक उत्पादने आणि सेवा पाहा.